शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 21:24 IST

सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, 'एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात येईल. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यांसोबत काम करत आहे आणि कोविड-19च्या उपचारावर औषध तयार करण्याच्या शक्यतांची पडताळणी करत आहे.

ठळक मुद्देफेवीपिरवीर औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला मिळालीये मंजुरीफायटोफार्मास्यूटिकल औषधाच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी ट्रायल यशस्वी झाल्यास कोरोनावरील उपचारासाठी स्वस्त ओषध उपलब्ध होणार आहे

नवी दिल्ली - संपूर्ण जगातील वैज्ञानिक कोरोनावर औषध शोधण्याचा जीवतोडून प्रयत्न करत आहेत. भारतातही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर, फेवीपिरवीर (Favipiravir) नावाच्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक (डीजी) शेखर मांडे यांनी सांगितले, की ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) फेवीपिरवीरसोबतच फायटोफार्मास्यूटिकल (Phytopharmaceutical) औषधाच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी दिली आहे. ही ट्रायल यशस्वी झाली, तर कोरोनावरील उपचारासाठी स्वस्त ओषध उपलब्ध होणार आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

एका आठवड्यात सुरू होईल ट्रायल -सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे म्हणाले, 'एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात येईल. सीएसआयआर अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यांसोबत काम करत आहे आणि कोविड-19च्या उपचारावर औषध तयार करण्याच्या शक्यतांची पडताळणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर काही कंपन्यांच्या सोबतीने गुरुवारपासून काही क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात आली आहे. डीजीसीआयने आम्हाला दोन औषधांच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी दिली आहे. याला लवकरच सुरुवात केली जाईल.'

फायटोफार्मास्यूटिकल एक असे औषध आहे, जे वनस्पतीपासून तयार होते. यात अनेक प्रकारच्या कंपाउंड्सचे  मिश्रण असते. मात्र, मुख्यतः हे एका वनस्पतीपासून निघते.

आणखी वाचा - CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

ट्रायल पूर्ण होण्यासाठी लागणार दीड महिना -फेवीपिरवीर एक सुरक्षित औषध असल्याचे म्हणत, सीएसआयआरचे डीजी म्हणाले, 'या औषधाचे ट्रायल दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर ट्रायल यशस्वी ठरले, तर लवकरच कोरोनावरील किफायतशीर औषध उपलब्ध होईल. याचे एक मुख्य कारण म्हणजे, फेवीपिरवीर एक जुने औषध आहे. याचे पेटंट आता एक्सपायर झाले आहे.

एका देशी औषधावरही क्लिनिकल ट्रायलची परवानगी -फेवीपिरवीर औषधाचा वापर जपान, चीन आणि इतर काही देशांमध्ये इन्फ्लुएंजावरील उपचारासाठी होतो. सीएसआयआर एका देशी जडी-बुटीला जैविक औषध अथवा फायटोफार्मास्यूटिकलच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. डेंग्यूवरील उपचारात याचा वापर होत आहे. आता यात कोविड-19 सोबत लढण्याची क्षमता आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतmedicineऔषधंMedicalवैद्यकीयmedicinesऔषधं