नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाचे केंद्र महाराष्ट्राकडून राजधानी दिल्लीकडे सरकू लागले आहे. आधीच गेल्या दोन महिन्यांपासून भूगर्भीय हालचालींमुळे १२ पेक्षा जास्त भूकंपाचे हादरे बसलेले असताना कोरोनाचाही स्फोट झाला आहे. यामुळे दिल्लीच्या राज्यपालांनी सर्वपक्षीयांची तातडीची बैठक बोलावली आहे.
राजधानी दिल्लीला आता कोरोनाने चांगलाच वेढा घातला असून या महामारीने चांगलेच हातपाय पसरले आहेत. सोमवारी एकूण टेस्टपैकी २७ टक्के लोक कोरोनाबाधित सापडले आहेत. याबरोबर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३०००० वर गेला आहे. एवढेच नाही तर दिल्लीतील आणखी एक आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. दिल्लीच्या दर चार नागरिकांमागे एक कोरोना पेशंट सापडू लागला आहे.
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी बोलावलेल्या बैठकीला अरविंद केजरीवाल अनुपस्थित असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया गेले आहेत. केजरीवाल यांना दोन दिवसांपासून ताप असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोकादिल्लीतील वाढत्या रुग्णांमुळे आता राजधानी संकटात सापडली असून कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये 29,943 रुग्ण सापडले असून यापैकी 11,357 रुग्णच बरे झाले आहेत. तर 17,712 रुग्ण उपचार घेत आहेत. या साऱ्या घडामो़डींवर आजच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या आपत्कालीन विभागाची बैठकही होणार आहे. दिल्लीमध्ये सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे तेथील हॉटस्पॉटमध्येही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये हॉयस्पॉटची संख्या वाढून १८३ झाली आहे. रविवारी ही संख्या १६९ एवढी होती.
केजरीवालांची आज टेस्टअरविंद केजरीवाल यांची गेल्या रविवार (दि.7) पासून प्रकृती बिघडल्याचे समजते. त्यांना ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत आहे. रविवारी दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदर्श गुप्ता आणि जुने मित्र कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले
चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद
अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी
दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय
बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात
आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल