नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 30,44,941 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 69,239 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 912 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 56,706 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) कोरोनावरील लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी स्वयंसेवकाच्या शोधात आहे. या परीक्षणात सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत.
अटी पूर्ण केल्यास तुमच्या इच्छेनुसार कोरोना लसीची चाचणी तुमच्यावर केली जाऊ शकते. आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्याची सुमारे 1000 लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. एम्स दिल्लीच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी 'आम्हाला 100 स्वयंसेवकांची गरज होती. मात्र आमच्याकडे सतत फोन येत राहिले. लोक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही चाचणीत सहभाग नोंदवण्यासाठी विनंती करत आहेत. या व्यतिरिक्त आम्हाला ईमेलद्वारे देखील शेकडो लोकांनी विनंती केली आहे' असं म्हटलं आहे.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रवक्ते डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही निरोगी भारतीय काही अटींसह या लसीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकते. या चाचणीत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार असू नयेत. निरोगी असणं गरजेचं आहे. या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एखादी दुखापत झाल्यास किंवा काही रिअॅक्शन झाल्यास त्या परिस्थितीत नुकसान भरपाई वगळता पैसे दिले जात नाहीत.
कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जात आहे. मापदंड पूर्ण करणाऱ्या पहिल्या 100 अर्जदारांना चाचणीसाठी निवडले जात आहे. सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के अर्ज बफरच्या रुपात वेगळे ठेवले जातात. एकदा का बेसिक स्क्रीनिंग झाले की मग अर्जदारांना चाचणीसाठी सादर व्हावे लागते. सर्वप्रथम त्यांची कोविड-19ची तपासणी केली जाते.
डॉ. राय यांनी स्वयंसेवकाचा एक स्वॅब नमुना रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेज चेन रिअॅक्शनसाठी (RRT-PCR) घेतला जातो. याद्वारे स्वयंसेवकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग आहे किंवा नाही हे पाहिले जाते. आम्हाला असे स्वयंसेवक हवे असतात त्यांना वर्तमानात आणि भूतकाळात देखील संसर्ग झालेला नसावा असं म्हटलं आहे. याद्वारे अँटीबॉडी आणि आरोग्याशी संबंधित इतर तपासण्यांसाठी ही रक्त चाचणी करण्यात येते. भारतात कोरोनाच्या तीन लसी विकसित केल्या जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील धक्कादायक घटना
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद
CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम
'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला