नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून आठ लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत.
डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान तेलंगणामधील एक घटना समोर आली आहे. डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या पेड्डापल्लीमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवत मृतदेह स्मशानभूमीत नेला.
श्रीराम गारू असं डॉक्टरचं नाव आहे. तेलंगणाच्या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. रुग्णालयात कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच केस असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. त्यामुळे एका ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यास कोणीही तयार नव्हतं. त्यावेळी डॉक्टर श्रीराम गारू यांनी पीपीई किट घालून स्वत: ट्रॅक्टर चालवला आणि मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही जोरदार व्हायरल होत आहे. लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या या गोष्टीचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. देशातील पाच लाख लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. तब्बल 5,53,471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा
Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"