CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:35 AM2020-05-05T10:35:45+5:302020-05-05T10:59:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संकट आणि आर्थिक आव्हानांबद्दल राहुल गांधींचा अभिजीत बॅनर्जींशी संवाद

CoronaVirus Marathi News Dont give money to people now its useless Abhijit Banerjee talks to Rahul Gandhi kkg | CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

Next

नवी दिल्ली: कोरोचा संकट गहिरं होत असल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. मोदी सरकार देशवासीयांना दिलासा देण्यासाठी दुसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत असताना बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची सूचना केली. सर्वसामान्यांच्या हाती आता थेट पैसा देऊ नका. तो काही दिवसांनंतर द्या, असं बॅनर्जी म्हणाले.

देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील, अशी भीती बॅनर्जींनी व्यक्त केली. 'अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल,' असं बॅनर्जी यांनी म्हटलं.

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत. मात्र आताचं सरकार त्या योजना नीट लागू करत नसल्याचं निरीक्षण बॅनर्जींनी नोंदवलं. यूपीए सरकारच्या अनेक योजना चांगल्या होत्या. या सरकारनं त्याच योजनांवर पुढे काम केलं याकडे लक्ष वेधताना त्यांनी आधार कार्डचा संदर्भ दिला. यूपीए सरकारच्या अनेक योजना कोरोना संकटाच्या काळातही उपयोगी ठरू शकतात. मात्र आज त्यांची देशभरात अंमलबजावणी केली जात नाही, असं बॅनर्जी म्हणाले.

येत्या काळात बँकांसमोरील समस्या आणखी वाढतील आणि नोकऱ्या वाचवणंदेखील कठीण होईल, असा मुद्दा राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर खरंच अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं बॅनर्जी म्हणाले. देशाला आर्थिक पॅकेजची गरज आहे. अमेरिका, जपाननं अशा पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र आपल्याकडे अद्याप अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही. लहान उद्योगांना आर्थिक मदतीची गरज असून चालू तिमाहीचं कर्ज माफ करण्यात यावं, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

Web Title: CoronaVirus Marathi News Dont give money to people now its useless Abhijit Banerjee talks to Rahul Gandhi kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.