नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरोनाच्या या संकटात मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र दुसरीकडे वापरलेल्या मास्क आणि हँड ग्लोव्हजचा कचरा ही वाढत आहे. या कचऱ्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. मात्र आता या समस्येवर एक उपाय शोधण्यात येत आहे. दिल्लीतील Effibar या कंपनीने एक भन्नाट बायोमास्क तयार केला आहे. विशेष म्हणजे ऊस शेती उत्पादनात निर्माण होणाऱ्या घटकांपासून, ऊसाच्या चिपाडापासून हा मास्क तयार करण्यात आला आहे. तब्बल 30 वेळा या मास्कचा वापर करता येणार आहे.
Effibar ग्रृपचे संस्थापक राजेश भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायोफेस मास्क एक बायोडिग्रेडेबल मास्क आहे. यामध्ये अँटी बॅक्टिरियाची क्षमता आहे. कारण हा मास्क पीएलएल कम्पाउंड आणि पॉलिएटिक अॅसिडपासून तयार करण्यात येतो. म्हणूनच हा मास्क बायोडिग्रेडेबल आणि अँटी बॅक्टिरियल आहे. तसेच हा खास मास्क 30 वेळा वापरता येऊ शकतो. तसेच बायोमास्कचा फायदा म्हणजे यामुळे रोज मास्क बदलण्याची आवश्यकता नाही.
नैसर्गित गोष्टींपासून बायोमास्क तयार करण्यात आल्याने तो नष्ट करणं देखील सोपं आहे. बायोमास्कचं हे तंत्रज्ञान जपानच्या टीव्हीएम कंपनी लिमिटेडचं आहे आणि Effibar ने त्यांच्याबरोबर करार केला आहे. कंपनी लोकलायझेशनवर लक्ष्य केंद्रीत करत आहे. इकॉनॉमी बायोमास्कची किंमत 145 ते 150 रुपये आहे तर प्रीमियम मास्कची किंमत 450 ते 500 रुपये आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर
लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल
"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला