प्रयागराज - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 90 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने कुटुंबियांनी रस्त्यावरच आपल्या कुटुंबियातील सदस्याचा मृतदेह सोडून दिल्याची घटना घडली आहे. खरं तर या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झालाच नव्हता. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी ही व्यक्ती मुंबईहून प्रतापगड जिल्ह्यात परतली होती.
प्रकृती बिघडल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. प्रतापगड-प्रयागराज महामार्गावर राणीगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाजवळ लोकांनी मृतदेह पडलेला पाहिला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला असता कोरोनाच्या भीतीमुळे मृताच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह रस्त्यातच सोडल्याची माहिती समोर आली.
महत्त्वाच्या बातम्या
TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...
CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम