नवी दिल्ली - सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. तर काही ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न होत आहे. अशाच एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सप्तपदीनंतर नवरा-नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना समोर आली आहे.
नवदाम्पत्याला पोलीस ठाण्यात येताना पाहून पोलीसही काही वेळासाठी हैराण झाले होते. मात्र जेव्हा दाम्पत्याने येण्यामागचं कारण सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता, कुटंबापासून दूर राहून लोकांची सेवा करत आहेत. त्यामुळेच अशा कोरोना वॉरिअर्सना सलाम करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लग्नसोहळा पार पडल्यावर नवदाम्पत्य पोलीस ठाण्यात आलं.
कोरोनाच्या लढ्यात पोलीस ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला नवरा-नवरीने सलाम केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या हिजलक गावामध्ये हा विवाह सोहळ संपन्न झाला. अनीष माझी असं नवरदेवाचं नाव असून त्याने संगीतासोबत लग्न केलं आहे. मास्क परिधान करून तसेच सोशल डिस्टंसिंगचं पालन करून हा लग्न सोहळा पार पडला. सप्तपदीनंतर अनीष आणि त्याची पत्नी जवळच्या पोलीस ठाण्यात पोलिसांचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झाले.
लोकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर असल्याने या दोघांनी त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच पोलिसांना 50 मास्क आणि सॅनिटायझर देखील भेट म्हणून दिले आहे. पोलिसांनी देखील या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 4,96,988 लोकांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा
CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक
CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं
काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ