CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 08:25 AM2020-05-14T08:25:33+5:302020-05-14T08:28:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे.
गुना - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 74,000 वर पोहोचली आहे. तर 2400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. विविध मार्गाचा वापर करून लोक आपल्या गावी जात आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.
मध्य प्रदेशच्या गुनामध्ये लॉकडाऊन दरम्यान कंटेनर आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 8 मजुरांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास 60 मजूर हे कंटेनरमध्ये होते. ते उत्तर प्रदेशचे रहिवासी असून महाराष्ट्रातून आपल्या गावी जात होते. याच दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Madhya Pradesh: 8 labourers dead & around 50 injured after the truck they were travelling in, collided with a bus in Cantt PS area in Guna last night. Injured persons shifted to district hospital.All the 8 killed labourers were going to their native places in UP from Maharashtra. pic.twitter.com/OaB9SCLpjY
— ANI (@ANI) May 14, 2020
अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुना येथील कँट परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाल्याने 8 मजुरांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाले. भीषण अपघातानंतर कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये रोडवेज बसने आपापल्या घरी परतणाऱ्या कामगारांना चिरडले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले, तर दोन गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
6 migrant workers who were walking along the Muzaffarnagar-Saharanpur highway killed after a speeding bus ran over them late last night, near Ghalauli check-post. Case registered against unknown bus driver. pic.twitter.com/s81e7gpYkH
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2020
सर्व मजूर पंजाबमध्ये कामाला होते आणि बिहारला जात होते. गुरुवारी मुजफ्फरनगर कोतवालीच्या सहारनपूर रोडवर मजूर पोहोचले, तेव्हा रोडवेज बसने त्यांना चिरडले. या घटनेत 6 कामगार जागीच ठार झाले, तर दोन जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. याव्यतिरिक्त जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असून ते पंजाबहून पायी परतत होते.
महत्त्वाच्या बातम्या
शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून
CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?
CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...