नवी दिल्ली -भारतात कोरोना संक्रमितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत 62,550 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादाक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 26,48,999 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.
आरोग्यमंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेली आकडेवारी -
- देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 34,63,973
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या - 62,550
- देशात आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या - 26,48,999
- गेल्या 24 तासांतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या - 76,472
- गेल्या 24 तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या - 1,021
- देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या - 7,52,424
महाराष्ट्र वाढवतोय चिंता - संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज जवळपास 14 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी तब्बल 14,361 नवे कोरोनाधित समोर आले आहेत. याच बरोबर महाराष्ट्रातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या आता 7,47,995 वर पोहोचली आहे. तर कोरनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 23,775 वर पोहोचला आहे.
दिल्लीत रोज आढळतायत 1800 पेक्षा अधिक रुग्ण - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून रोज कोरोनाचे 1800 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. दिल्लीत शुक्रवारी 1,808 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,69,412 वर पोहोचला आहे. येथे शुक्रवारी एका दिवसात 1800 हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले होते. तर गुरुवारीही 1,840 रुग्ण आढळून आले होते. दिल्ली आरोग्य विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 4,389 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील महाराष्ट्र आणि दिल्ली बरोबरच, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि हरियाणा येथेही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
अंधारी रात्र, जबरदस्त पाऊस अन् गोळ्यांचा वर्षाव; आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा
कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा