नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 90 लाखांवर गेली आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता चौथ्या स्थानी आला आहे. तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 15,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 465 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 14,476 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (24 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15,968 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाख 56 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 183022 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 258685 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांचे तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (Remdesivir) आणि फेवीपिरवीर (Favipiravir) औषधांची निर्मिती करणार आहे. अनेक ठिकाणी त्याची क्लिनिकल चाचणी झाली असून परिणाम चांगले आले आहेत. रुग्णांवर ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा
"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल
लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार
Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध