नवी दिल्ली - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सात लाखांपर्यंत पोहोचली आहे. लॉकडाऊनमध्ये काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक भयंकर घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका तरुणाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने कोरोनाच्या धास्तीने जीवन संपवलं आहे. प्रकृती बरी नसल्याने तरुण एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेत होता. त्यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तरुण रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेला मात्र तिथे बेड उपलब्ध नसल्याने दाखल होऊ शकला नाही. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने आपल्या मित्राला फोन करुन तलावाच्या बाजूला फिरायला नेण्यास सांगितले. तलावा जवळ गेल्यानंतर त्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असताना हैदराबादमध्ये आणखी एक भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका ज्वेलरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ज्वेलरने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये शेकडो लोक होते. त्यामुळे आता जवळपास 100 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल
"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण