शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कौतुकास्पद! मजुरांच्या मुलांना घेता यावे ऑनलाईन शिक्षण म्हणून 'त्यांनी' दान केले फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 09:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल चार लाखांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ऑनलाईन शाळा आणि ई-लर्निंग हे अनेक ठिकाणी सुरू झालं आहे. मात्र देशात असे अनेक विद्यार्थी आहेत. ज्याच्याकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणं शक्य नाही. मात्र यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. हैदराबादमधील काही लोकांनी मजुरांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी आपले स्मार्टफोन त्यांना दान केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांना शिक्षणासाठी आणखी समस्यांचा सामना करावा लागून नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 

हैदराबादमध्ये राहणाऱ्या मधू यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी नवा फोन घ्यायचा होता. मात्र आधी असलेलं कर्ज आणि आता लॉकडाऊन यामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे मधू यांनी अशा गरजूंना मदत करण्याचा विचार केला. त्यांना शक्य ती मदत करण्यास सुरुवात केली. मजुरांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून इतरही अनेक लोकांनी आपले स्मार्टफोन दान करून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. 

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. फोन दान करण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. यामुळे मजुरांच्या मुलांना, अनेक गरीब विद्यार्थ्यांना फायदा झाला असून ते लॉकडाऊनच्या काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यास करत असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतासह दक्षिण आशियाई देशातील पाच वर्षांहून कमी वयाची आणखी 12 कोटी मुले पुढील सहा महिन्यांत दारिद्र्याच्या खाईत लोटली जाऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता मुले व महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘युनिसेफ’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणdigitalडिजिटलSchoolशाळाStudentविद्यार्थी