नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 3303 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. कोरोना रुग्णाच्या मृतदेहामध्ये व्हायरस किती वेळ जिवंत राहतो? तसेच त्याच्यामार्फत तो पसरतो का? याबाबत आता इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे.
मंगळवारी आयसीएमआरला मृतदेहामध्ये किती वेळ व्हायरस असतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो मात्र किती वेळेत तो कमी होतो याची माहिती नाही असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तसेच रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करताना चिरफाड करण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीचा अवलंब करावा असंही आयसीएमआरने म्हटलं आहे.
CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी
कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आणि त्याचे टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आले तर त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबतही आयसीएमआरने मार्गदर्शन केलं आहे. कोरोनाच्या अनेक चाचण्या चुकीच्या येत असल्याची प्रकरणं लक्षात घेत प्रत्येक संशयित कोरोना प्रकरणं समजावं आणि या परिस्थितीत मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करताना चिरफाड करू नये, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चने (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित
बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप
कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान
CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय