नवी दिल्ली - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आज देशाला आनंदाची बातमी दिली आहे. आयसीएमआरने सांगितले, की कोविड-19 साठी दोन स्वदेशी लसींचे परीक्षण सातत्याने पुढे जात आहे. तसेच या लसींचे उंदीर आणि ससा यांच्यावरील टॉक्सिसिटी स्टडी यशस्वी ठरली आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोरोनासंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले, अभ्यासाचे आकडे देशाच्या ड्रग कंट्रोलर जनरलला पाठविण्यात आले होते. यानंतर या दोन्ही लसींना मानवी परीक्षणासाठी परवानगी मिळाली. (Corona Vaccine)
भार्गव म्हणाले, 'याच महिन्यात मानवावरील पहिल्या टप्प्यातील परीक्षणासाठी आम्हाला मंजुरी मिळाली. दोन्ही लसींच्या परीक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे आणि दोन्हींचीही जवळपास 1-1 हजार लोकांवर क्लिनिकल स्टडीदेखील सुरू आहे.' यावेळी भार्गव यांनी आणखी एक मोठी गोष्ट सांगितली. ती म्हणजे जगात वापरल्या जाणाऱ्या 60 टक्के लसी या एकट्या भारतात तयार होता. ही गोष्ट जगातील प्रत्येक देशाला माहित आहे. त्यामुळेच सर्व देश भारताच्या संपर्कात आहेत.
भार्गव म्हणाले, रशियानेही लवकरात लवकर लस तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यावर यशही मिळाले आहे. चीनदेखील कंबर कसून लस तयार करण्याच्या कामात लागला आहे. तेथे वेगाने लसीवर संशोधन केले जात आहे. अमेरिकेतही दोन लसींवर वेगात काम सुरू आहे. 'आज आपण वाचलेच असेल, की अमेरिकेने आपल्या दोन लसी फास्टट्रॅक केल्या. इंग्लंडदेखील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लसीवर वेगाने काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"
सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या
CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा