इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आणि इनक्युबेटेड स्टार्टअपने एक अनोख आविष्कार साकारत पोर्टेबल हॉस्पिटल विकसित केले आहे. जे दोन तासांत चार लोकांच्या मदतीनं कोठेही बसवता येणार आहे. मोडुलस हाऊसिंग सोल्युशनद्वारे विकसित केलेले फोल्डेबल पोर्टेबल हॉस्पिटल मेडिकॅबमध्ये चार झोन आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांची खोली, एक अलगीकरणाचा कक्ष, एक वैद्यकीय कक्ष/वॉर्ड आणि एक जुळ्या बेडच्या आयसीयूचा समावेश आहे. या स्टार्टअपने लहान रुग्णालये विकसित केली जात आहेत, जी देशभरात वेगाने वापरली जाऊ शकतात.या पोर्टेबल रुग्णालयांचा उद्देश स्थानिक समुदायांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शोधणे, त्यांची तपासणी करणे, त्यांना अलग करणे आणि उपचार देण्याचा आहे. मॉड्युलस हाऊसिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम रविचंद्रन म्हणाले, "केरळममध्ये या पायलट प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म रुग्णालयांचे महत्त्व अधोरेखित केले जाऊ शकते. MediCAB तात्काळ समाधान करण्यासाठी महत्त्वाचं आहे. रविचंद्रन म्हणाले, "तात्काळ इमारती बांधणे अवघड आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी असल्याने तेथे छोट्या रुग्णालये कोरोना प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बरीच मदत करू शकतात. मोडुलस हाऊसिंगने तामिळनाडूच्या चेंगलपेटमध्ये आपला उत्पादन कारखाना सुरू केला आहे. ते म्हणाले की, कोरोनानंतर ग्रामीण भागात छोटी रुग्णालये/दवाखाने म्हणून तयार करता येतील.
हेही वाचा
खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना
बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी
धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा
देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट