नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केल्यानंतरच्या कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी 40 हजार असलेली रुग्णांची संख्या त्यानंतर काही दिवसांतच 90 हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे.
स्थलांतरामुळे विशेषत: शहरातील कोरोना हा गाव-खेड्यांमध्ये पोहचल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती ही चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील स्थिती ही गंभीर आहे. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 46 हजार आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 2,800 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत.
अहमदाबादमध्ये आढळले 973 कोरोना रुग्ण
गुजरातमध्ये शनिवारी आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 493 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 14 जणांचा शनिवारी मृत्यू झाला. आतापर्यंत गुजरातमधील संक्रमितांचा आकडा 10,989वर पोहोचला आहे.
दिल्ली 10 हजारच्या जवळ, तामिळनाडू 10 हजारच्या पुढे
राजधानी दिल्लीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9,333 वर गेला आहे. येथे शनिवारी 438 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत दिल्लीत 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण दिल्ली सध्या रोडझोनमध्ये आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये आज 477 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच येथील कोरोना रुग्णांचा आकडा 10,585 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्राची स्थिती गंभीर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. हा आकडा आता तब्बल 30 हजार 706 वर जाऊन पोहोचला आहे. दिवसभरात राज्यात एकूण 1606 नव्या रुग्णांचे निदान झाले. तर 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर 22 हजार 479 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?
चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी
धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा