नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 30 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 69,874 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 लाख 75 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 55,794 वर पोहोचला आहे. यानंतर आता पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्या ही 30 लाखांच्या वर गेली असून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे.
रिपोर्टनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या ही 30,37,657 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 56,762 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 22,71,054 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे. रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढले असून 74.69 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका, ब्राझील नंतर आता भारताचा तिसरा क्रमांक आहे.
देशातील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले असून गेल्या 24 तासांत दहा लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 3,44,91,073 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आठ लाखांच्या वर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती
देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू
मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला
19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक