नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 84 लाखांवर गेली असून चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आाहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन लाख 95 हजारांवर पोहोचली आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14516 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर लोकांना 375 आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 395048 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 12948 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (20 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14516 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 लाख 95 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 168269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 213831 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाच्या संकटात आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. फेवीपिरवीर (Favipiravir) हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोविड-19 च्या उपचारासाठी फेवीपिरवीर (Antiviral drug Favipiravir) चा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. आपात्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जाईल आणि त्यासाठीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार
"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"
वरात, विधीसह रंगला विवाहसोहळा पण लग्नात नवरी ऐवजी होता पुतळा... एका लग्नाची गोष्ट
Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट
खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल
"पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"