नवी दिल्ली - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. सातत्याने धोका वाढत असून रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडत नवा उच्चांक गाठला आहे. मात्र याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 22,771 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18655 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 60.80 टक्के झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (4 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 22,771 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहा लाख 48 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 18 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 235433 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 394227 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच देशातील रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे.
जवळपास चार लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा कमी आहे. 394227 लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांवरीलच्या उपचारासाठी सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. एका प्रभावी औषधाचा डोस कमी केला आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिव्हरची क्लिनिकल चाचणी झाली असून परिणाम चांगले आले आहेत. रुग्णांवर ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता त्याचा डोस कमी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी
CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन
CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका
घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी
CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ