नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात देशात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरणhttps://t.co/YWV7zK2HU0#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine— Lokmat (@MiLOKMAT) August 28, 2020
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी 16,867 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकणू रुग्णांची संख्या 7,64,281 झाली आहे.
CoronaVirus News : कोरोनासंदर्भात रिसर्चमधून समोर आली धक्कादायक माहितीhttps://t.co/ULi2vQkTFy#coronavirus#CoronaUpdates#COVID19— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. तसेच, राज्यात 328 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या 24 हजार 103 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.15 % एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.58 टक्के एवढे झाले आहे. देशामध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान
'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान
CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी
"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप
देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य