नवी दिल्ली - कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 11 लाखांच्या वर गेला आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अकरा लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (20 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40,425 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 27,497 वर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,90,459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7,00,087 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या व बळी महाराष्ट्रात आहेत.
देशांतील एकत्रित रुग्णसंख्या भारतापेक्षा आठपट जास्त
अमेरिका, ब्राझिल, रशिया, पेरु, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, इराण, पाकिस्तान, स्पेन, चिली या अकरा देशांमधील रुग्णांची संख्या एकत्रित केली तर ती भारतातील रुग्णसंख्येपेक्षा आठपट जास्त व या देशांतील एकत्रित मृत्यूदर भारतापेक्षा 14 पटीने अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती