नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 27,292,583 वर गेली असून आतापर्यंत 887,554 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,016 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42,04,614 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 71,642 वर पोहोचला आहे.
कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,82,542 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोना व्हायरसचं हे संकट 2021 पर्यंत असणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिल्लीसह देशातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील म्हटलं आहे.
AIIMSच्या प्रमुखांनी दिली कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती
डॉ. रणदीप गुलेरिया हे केंद्र सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्समधील एक अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं आहे. कोरोनाचं हे महाभयंकर संकट 2021 पर्यंत जाईल असं आपण सांगू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत होता तो मात्र कमी झाला आहे हे निश्चित सांगता येईल असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. "काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशातील काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे कोरोना चाचण्यांची वाढवण्यात आलेली संख्या आणि दुसरं म्हणजे लोक नियमांचं पालन करत नाहीत." कोरोनावर मात करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी आशा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून केला 1200 किमीचा खडतर प्रवास अन्...
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"
माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार
धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...