नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (17 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 97,894 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,132 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 51,18,254 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 83,198 वर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 10,09,976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 40,25,080 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नोएडामधील दोन आणि मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्ली सीएसआईआरच्या इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आयजीआयबी) च्या रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.
मुंबईतील चार आणि नोएडातील दोन रुग्णांना पुन्हा लागण
आयजीआयबीचे अनुराग अग्रवाल यांनी देशामध्ये रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये मुंबईतील चार आणि नोएडातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाची पुन्हा लागण होते का याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांचे सँपल घेतले असून त्याची चाचणी केली जात आहे. कोरोनाची पुन्हा लागण होते का याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांचे सँपल घेतले असून त्याची चाचणी केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर कोरोनातून बऱ्या झालेल्या जवळपास 14 टक्के लोकांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...
ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र