नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 56 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून हादरणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 83,347 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,646,011 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 90 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोकांना गमवावा लागला जीव
बुधवारी (23 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,347 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 5,646,011 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 90,020 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 9,68,377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 45,87,614 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा
कोरोनाच्या संकटात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरचा सल्ला घेण्याऐवजी अनेक जण हे आजारी पडल्यास मेडिकलमधून औषध घेतात. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय इतर कोणतीही औषधं घेणं हे जीवावर बेतू शकतं. योग्य वेळी उपचार न झाल्यास ते महागात पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना रुग्ण हे उपचारासाठी उशीरा दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात घाबरू नका, वेळीच योग्य उपचार करा असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध"
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा
खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...
काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत
अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध