नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 562,888 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 12,630,886 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. तर दुसरीकडे देशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा पार केला आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 27,114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने 22,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
शनिवारी (11जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 27,114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आठ लाखांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,83,407रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5,15,386 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे.
कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर काम सुरू आहे. भारतातही 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील कोवॅक्सीन लाँच करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणं कठीण असल्याची माहिती मिळत आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 हे वर्ष येईल असं म्हटलं जात आहे. संसदीय समितीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षी कोरोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणं शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार
CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"
CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन
"मंदिराच्या समोर आल्यावर फोन करा", डिलिव्हरी पॅकेटवरचा पत्ता पाहून चक्रावून जाल
लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल