नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 39 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून हादरणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 83,341 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,096 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 39,36,748 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 68 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
शुक्रवारी (4 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,341 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39,36,748 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 68,472 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,31,124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 30,37,152 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच या कोरोनाग्रस्तांच्या शरीरात व्हायरसचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. काही कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणं दिसतात तर काहींमध्ये लक्षणं दिसत नाहीत. मात्र आता लक्षणं असलेल्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं रिसर्चमधून समोर आली आहे. तेलंगणातील 200 हून अधिक कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चमधून कोरोना व्हायरसशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स (CDFD) च्या शास्त्रज्ञांनी आणि इतरही संशोधकांनी मिळून हा रिसर्च केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू
धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर
सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...
लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग