नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 90,633 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 41 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 70,626 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
देशात 13 दिवसांत 10 लाख नवे रुग्ण
कोरोना रुग्णांची 10 लाख संख्या 20 लाख होण्यास 21 दिवस लागले. त्यापुढच्या 16 दिवसांत रुग्णसंख्या 30 लाखांवर गेली. त्यानंतर अवघ्या 13 दिवसांतच हा आकडा 40 लाखांहून अधिक झाला. कोरोना साथीच्या प्रारंभी रुग्णांची संख्या 1 लाख व्हायला 110 दिवस व 10 लाख रुग्ण होण्यासाठी 59 दिवस लागले होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 47738491 झाली आहे. देशात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचे लक्ष्य आयसीएमआरने ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना
बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ