CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:35 PM2020-07-24T12:35:39+5:302020-07-24T12:37:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनादेखील समोर येत आहे. 

CoronaVirus Marathi News indias oldest couple fight against virus and win | CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढला असून धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या 11 लाखांवर असलेल्या संख्येने केवळ तीन दिवसांत 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 49,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 740 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनादेखील समोर येत आहे. 

देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने कोरोनाविरोधातील युद्ध जिंकलं आहे. तब्बल 25 दिवसांनी केरळमधील या दाम्पत्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 93 वर्षीय थॉमस अब्राहम आणि 89 वर्षीय त्यांची पत्नी मरियम्मा यांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. गेल्या 25 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलापासून या दाम्पत्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

थॉमस आणि मरियम्मा यांचा मुलगा इटलीवरुन भारतात परतला होता. मुलाच्या संपर्कात आल्याने या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. थॉमस आणि मरियम्मा यांनी 25 दिवस कोरोनाविरोधात लढा दिला. उच्च रक्तदाब आणि मधुमेहासह आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्रकृती काही दिवस गंभीर होती. व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. मात्र दाम्पत्याने उपचारानंतर आता यशस्वीरित्या मात केली आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तब्बल 12 लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (24 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 49,310 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30,601  वर पोहोचला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

Web Title: CoronaVirus Marathi News indias oldest couple fight against virus and win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.