CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:39 PM2020-08-25T14:39:25+5:302020-08-25T14:41:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

CoronaVirus Marathi News Karnataka Congress DK Shivakumar positive for COVID19 | CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 31,67,324 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60,975 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 848 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 58,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटककाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

डी. के. शिवकुमार यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांनी देखील याआधी कोरोनाची लागण झाली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचाही कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. डी. के. शिवकुमार हे कर्नाटकमधील काँग्रेसचे वोक्कालिंगा समाजातील एक प्रमुख नेते आहेत. कर्नाटकात ते डी. के. एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत. मागील सिद्धारामय्या सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. 2009 मध्ये डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. 

कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये डी. के. शिवकुमार यांचा समावेश होता. 2013 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली 250 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती, त्यामध्ये आता वाढ होऊन जवळपास 600 कोटी इतकी झाली आहे. डी. के. शिवकुमार आज काँग्रेसबरोबर असले तरी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. 1985 मध्ये त्यांनी वोक्कालिंगा समाजाचे मोठे नेते एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध वयाच्या पंचविसाव्या वर्षी निवडणूक लढविली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल

थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा

लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य 

Web Title: CoronaVirus Marathi News Karnataka Congress DK Shivakumar positive for COVID19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.