नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 11 लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. मात्र याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिका आग लावून पेटवून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. बेळगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक रुग्णालयाच्या आयसीयूमधील डॉक्टरांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेलाची आग लावली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावमधील बीआयएमएस रुग्णालयाबाहेर हा सर्व प्रकार घडला. रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला आग लावली. तसेच रुग्णालयावर दगडफेक केली. या वेळी काही जणांनी आयसीयूमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त त्यागराज यांच्यासहित अनेक वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेला नातेवाईकांनी आग लावल्यावर अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कर्नाटकमध्ये बुधवारी सर्वात जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 4764 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या 75833 झाली आहे. तर आतापर्यंत 1519 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...