नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी 30 हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. यात काही प्रमाणात यशही येत आहे. याच दरम्यान रुग्णसेवा करा आणि 5000 मिळवा अशी नवी योजना केला राज्याने सुरू केली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाग्रस्तांसाठी अनेक ठिकाणी फायदेशीर ठरत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन सरकारांमार्फत केलं जात आहे. त्यापैकी एका सरकारने प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून काही पैसे देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढाकार घेतील यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
कर्नाटक सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकार त्यांना 5000 रुपये देणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात आतापर्यंत 17,390 जण बरे झाले आहेत. ज्यापैकी 4992 रुग्ण बंगळूरूचे आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सुधाकर यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. आता देशात दररोज 30 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 63.25 टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात. त्यातल्या केवळ 0.32 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची, तर 3 टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते, अशी माहिती हर्षवर्धन यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर