कटिहार - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 70,000 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. याचदरम्यान विविध घटना समोर येत आहेत.
लॉकडाऊनमध्ये लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोनाच्या भीतीने गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र बिहारमध्ये लॉकडाऊन दरम्यान एक अजब घटना घडली आहे. घर बंद असलेलं पाहून चोरांनी एका घरामध्ये चोरी केली. मात्र त्या घरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याने चोरांना जेल ऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बिहारमधील कटिहारमधील दोन चोरांनी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात चोरी केली. मात्र पोलिसांच्या तत्परतेने चोरी करणारे आरोपी हे ग्रामस्थांच्या मदतीने पकडले गेले.
चोरी केल्याचं दोघांनीही कबूल केलं आणि चोरी केलेले सर्व सामान पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी या दोघांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमरकांत झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरसेला पोलीस स्टेशन परिसरातील तीन घारिया गावात एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, घर रिकामं असल्याचे पाहून या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्लॅन रचला होता. पोलिसांन दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या घरात चोरी केल्याने त्यांना क्वारंटाईन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल