CoronaVirus News : महाराष्ट्रासाठी दीर्घकाळानंतर मोठा दिलासा; मात्र 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 30, 2020 06:54 PM2020-10-30T18:54:06+5:302020-10-30T18:56:56+5:30
साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत.
नवी दिल्ली - साप्ताहिक दृष्ट्या कोरोनाच्या दैनंदिन अॅव्हरेज रुग्ण संख्येत महाराष्ट्र आतापर्यंत सर्वात पुढे होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या जवळपास पोहोचला होता. मात्र, आता केरळने या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकले आहे. आता, दक्षिणेकडील हे राज्य साप्ताहिक आधारावर अॅव्हरेज डेली रुग्ण संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा -
साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत. 17 सप्टेंबरला साप्ताहिक आधारावर महाराष्ट्रातील अॅव्हरेज रुग्ण 22,149 एवढे होते. ते 28 ऑक्टोबरला कमी होऊन 6,158 वर पोहोचले आहेत.
केरळचं टेन्शन वाढलं -
साप्ताहिक आधारावर केरलमध्ये 15 ऑक्टोबरला अॅव्हरेज देनंदिन केसेस 8,440 होते. 28 ऑक्टोबरला हा आकडा थोडा कमी होऊन 7,089 झाला. असे असूनही, महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा 1 हजारने अधिक आहे.
देशात 85 दिवसांत पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाखच्या खाली -
देशात जवळपास तीन महिन्यांनंतर अॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 6 लाखपेक्षा कमी झाली आहे. एकूण रुग्णसंख्येचा विचार करता हा आकडा 7.35 टक्के एढाच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. आज देशात एकूण 5,94,386 रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. 6 ऑगस्टला हा आकडा 5.95 लाख एवढा होता. मंत्रालयाने म्हटले आहे, की कोरोनापासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारत अजूनही पहिल्या स्थानावर आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.