नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 40 हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 6929 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. याच दरम्यान विविध घटना समोर येत आहे तसेच काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मुलगी घराच्या छतावर अभ्यास करताना दिसत आहे. नमिता नारायण असं या मुलीचं नाव असून ती केरळमध्ये राहते. नमिताने छतावर बसून क्लास अटेंड केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये राहणाऱ्या नमिता नारायण हिच्या घरी नेटवर्कची समस्या होती. नेटवर्क मिळावं यासाठी ती घराच्या छतावर जाऊन बसली आणि तिने पूर्ण क्लास तिथून अटेंड केला. नमिताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाचा झाडावर बसलेला फोटो व्हायरल झाला होता. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवताना अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पश्चिम बंगालमधील एका शिक्षकाने थेट झाडावरूनच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला.
Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक
सुब्रत पाती असं या पश्चिम बंगालच्या शिक्षकाचं नाव असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते रोज झाडावर चढतात. तिथे रेंज चांगली येत असल्याने त्यांनी बसण्यासाठी जागा तयार केली आहे. सुब्रत पाती हे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील शिक्षण संस्थेमध्ये इतिहास विषय शिकवतात. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं हा त्यांना प्रश्न पडला होता. ऑनलाईन शिकवताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. सुब्रत यांना झाडावर जाऊन शिकवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी झाडावर रेंज येईल अशा ठिकाणी बसून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण
अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एका वादळाचा धोका; हवामान खात्याचा इशारा
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स
CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध