पाटणा - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक कोटीच्या वर गेली आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बिहारच्या पाटणामध्ये घडली आहे.
कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. एका दिव्यांग शिक्षिकेने तीन महिने पगार नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फतुहा पोलीस स्टेशन भागात आर्थिक अडचणींना कंटाळून या एका अपंग विधवा शिक्षिकेने पूनपून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अपंग महिला शिक्षिकेची ट्राय सायकल जप्त केली आहे. सध्या मृतदेहाचा शोध घेणं सुरू आहे.
शांती देवी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदपूर येथे त्या राहत होत्या. शांती देवी यांच्या पतीचे 2 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आपल्या दोन मुलांचा संगोपन करण्यासाठी त्यांनी एका खासगी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने तीन महिने पगार देण्यात आला नव्हता. कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. शांती देवी यामुळे खूप चिंतेत होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक भयंकर घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका तरुणाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने कोरोनाच्या धास्तीने जीवन संपवलं आहे. प्रकृती बरी नसल्याने तरुण एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेत होता. त्यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तरुण रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेला मात्र तिथे बेड उपलब्ध नसल्याने दाखल होऊ शकला नाही. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने आपल्या मित्राला फोन करुन तलावाच्या बाजूला फिरायला नेण्यास सांगितले. तलावा जवळ गेल्यानंतर त्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.
महत्त्वाच्या बातम्या
Mumbai Rain Updates : सलग कोसळलेल्या मान्सूनची सोमवार अखेर विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद
CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...
"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल
"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"
भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण