नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3390 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1273 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 56,342 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3390 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 56 हजारांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1800 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 16,540 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून 16,540 जणांनी लढाई जिंकली आहे. जवळपास 29.36 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत असून तब्बल 39 लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 271,017 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 39 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,932,626 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,349,138 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जवळपास 13 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर मात केली आहे. 1,349,138 लोक कोरोनातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"
CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकले, 13 लाख लोक बरे होऊन घरी परतले
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा
CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा