टेहरी - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 65 लाखांवर गेला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. असाच लॉकडाऊनचा फटका एका तरुणाला देखील बसला आहे.
कोरोनाच्या संकटात काम गेल्याने सिंगापूरमध्ये गेलेल्या एका तरुणाला आपल्या गावी परत यावे लागले आहे. सध्या हाती काहीच काम नसल्याने त्याला शेतात बकऱ्या चाराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या टेहरी भागातील अनेक तरुण हे विदेशात नोकरीसाठी गेलेले आहेत. जास्त तरुण हे हॉटेलमध्ये काम करतात. कोरोनाच्या या काळात सिंगापूरच्या हॉटेलमध्ये शेफ असलेल्या एका तरुणाला बकऱ्या चाराव्या लागत आहेत.
आशिष डंगवाल असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आशिष दोन वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये कामानिमित्त गेला होता. तेथील एका हॉटेलमध्ये तो शेफ म्हणून काम करत होता. चांगला पगार असल्याने तो तिथेच राहत असून घरी पैसे पाठवत असे मात्र लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद झालं. काम नसल्याने आशिषला आपल्या गावी परत यावं लागलं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याने स्वत: कडे असलेल्या पैशातून काही बकऱ्या विकत घेतल्या आणि तो त्या शेतात चरायला घेऊन जातो. त्याला कुटुंबियांची चिंता सतावत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"
CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?
CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...
CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार
CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ
CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...