पाटणा - भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 37,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही गावातील एक तरुण आणि तरुणी भेटत होते. गावकऱ्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी या दोघांना भेटताना पाहिलं आणि थेट त्यांचं एका मंदिरात लग्न लावून दिलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत त्यांचं लग्न लावून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय येथे ही घटना घडली आहे. कोठीयारा गावातील ललित कुमार याचे गावातीलच राणी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गेल्या एक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र लॉकडाऊन दरम्यान देखील हे दोघं भेटत असल्याची माहिती गावकऱ्यांना कळली.
गावकऱ्यांनी एकदा या दोघांना गावामध्येच भेटताना पकडलं. त्यानंतर गावातील प्रमुखांनी पंचायत बोलावून दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केलं. गावातील एका शिव मंदिरात ललित आणि राणी यांचे लग्न झाले. यावेळी गावकरी उपस्थित होते. तसेच लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. दोघेही मास्क लावून बोहल्यावर चढले. दोघांनाही भेटताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे. यांसंदर्भात सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च यांचा एक अहवाल समोर येत आहे. त्यानुसार, शहरातील लोकसंख्या 11 टक्क्यांनी कमी झाली असून गावातील लोकसंख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे. लॉकाडाऊनमुळे सध्या शहरात कुणीही येत नाही. सीपीआरचे वरिष्ठ विद्यार्थी आणि स्टी के चे सहायक लेखल पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे लाखों लोक आता शहरांकडे येत नाहीत. त्यामुळेच, शहरांजवळी ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. पश्चिमी राजस्थान, ओडिशाजवळ हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना सलाम; रुग्णालयांवर हवाई दलाकडून पुष्पवर्षाव
गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ