भोपाळ - जगभरातील अनेक देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनदरम्यान लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. याच दरम्यान काही लहान मुलं ही घर सोडून पळून जाऊ लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये मुलं आपल्या पालकांकडे असे काही हट्ट करत आहेत जे लॉकडाऊनमध्ये पूर्ण करता येऊ शकत नाही. त्यामुळेचं मुलं पळून जाण्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 30 पेक्षा अधिक प्रकरणं समोर आली आहेत. चाईल्ड लाईन काऊन्सलिंगनंतर या मुलांना त्यांच्या घरी पुन्हा सोडण्यात आलं आहे. घर ते शाळा या प्रवासात मुलं सक्रिय असतात. मात्र आता लॉकडाऊनमुळे मुलं घरात कैद झालेत. त्यांना खेळायला मिळत नाही.तसेच घरामध्ये एखाद्या बंद खोलीत अभ्यास करावा लागतो आहे. मुलं घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मात्र घरातील मोठी माणसं त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. त्यामुळे नाराज झालेली मुलं आता घर सोडून पळून जाऊ लागलेत. आई-वडिलांचं ओरडणं त्यांना आवडत नाही आहे.
भोपाळ चाईल्ड लाईन प्रभारी अर्चना सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लॉकडाऊनमुळे मुलं घराबाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत आई-वडील ओरडल्याने ते नाराज होऊन घर सोडून जातात. मुलांना घराबाहेर खेळायचं आहे, त्यांना वेगवेगळ्या वस्तू हव्या आहेत. मुलं घर सोडून पळातात आणि इकडेतिकडे फिरतात तेव्हा पोलीस त्यांना पकडून चाईल्ड लाईनकडे सोपवतात'
पोलिसांना अशी 30 पेक्षा अधिक मुलं सापडलीत. त्यांना चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करण्यात आलं. चाईल्ड लाईनने त्यांचं समपुदेशन केलं. समुपदेशनादरम्यान समजलं की, आईवडील ओरडल्याने ही मुलं घर सोडून पळत आहेत. मुलांना पहिल्यासारखं खेळायला मिळत नाही. बंद खोलीत त्यांचा अभ्यास होतो. पालकांनी सांगितलं की मुलं अशा वस्तूंची मागणी करत आहेत, जी त्यांना देऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये अनेक दुकानं बदं आहेत. अशात मुलांची मागणी पूर्ण नाही करू शकत. याबाबत लहान मुलांना नीट समजवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?
CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका
CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण
देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान
CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले
CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती