नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,51,767 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6387 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आता एक स्पष्टीकरण दिलं आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुरू कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. तसे कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 'केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत' असं ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीत. लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज आहे.
शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर अध्यादेश अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे 15 जूनपासून शाळा सुरू होतील,असे वाटत नाही,अशा प्रतिक्रिया पालक व शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे. तसेच येत्या 15 जूनपासून शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला जात आहे. राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी येत्या 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असल्याची भूमिका बोलून दाखविले. परंतु, पालक संघटनेचा शाळा सुरू करण्यास तीव्र विरोध आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण
CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह
CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा
CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण