कोलकाता : ममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहे. यामुळे आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने, कोरोना परीक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ करत, कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट समितीच्या क्षेत्राधिकारातही बदल करत आणि लॉकडाउन कठोर करत, आपली रणनीती बदलली आहे. एवढेच नाही, तर ममता सरकारने यासंदर्भात निवडणूक डावपेचातील रथी प्रशांत किशोर यांच्याशीही संपर्क साधला आहे.
तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.
राज्यात कोरोनाचे 1344 रुग्ण -तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जिल्ह्यामधून येणारे अहवाल चिंताजन होते. कारण या संकटाच्या काळात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाप्रती जनता संतप्त होती. केंद्रावर केली जाणारी टीकाही जनतेच्या गळ्याखाली उतरली नाही आणि कोरोनाच्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.' सध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत. 140 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हणण्यात आले आहे. तर इतरांना इतर आजारही होते.
प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क -तृणमूलच्या आणखी एका नेत्याने म्हटले आहे, की ‘2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, कोरोनाच्या मुद्द्यावरून ममता सरकारवर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक बहुआयामी रणनीती तयार करण्यात आली आहे. जी लागू करण्यासाठी प्रशासकीय तथा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्ष सशक्त असल्याचे दाखवत आहे, चुकाही सुधारत आहे. तसेच भाजपशीही दोन हात करत आहे.'