नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 29 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 29,05,824 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 68,898 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 54,849 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनाच्या भीतीने आपला नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर काहीजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. याच दरम्यान काही लोक देवदूत ठरत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत. एक चहावाला कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याची घटना समोर आली आहे. अब्दुक रजाक असं या चहावाल्याचं नाव असून तो कोरोनाच्या संकटात मदतीसाठी तत्पर असलेला पाहायला मिळत आहे. रजाकचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी त्याला सलाम केला आहे.
एका लहान मुलीचा मृतदेह रजाकच्या हातात असलेला पाहायला मिळत आहे. त्याने त्या मुलीवर अंत्यसंस्कार केले आहेत. रजाकचं चहाचं छोटसं दुकान आहे. मात्र तो एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असल्यास दुकान बंद करून मदत करतो. एका संस्थेशी तो संबंधित आहे. कोरोनाच्या लढ्यात लोकांची मदत करण्यासाठी तो हे काम करत असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील एका मुलीला किडनीसंबंधी आजार होता.
उपचारासाठी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी तिला कोरोनाची लागण झाली आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी रजाकने त्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. 'हा खूप कठीण काळ आहे, लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी लोकांच्या मदतीसाठी हा निर्णय घेतला. फोन आला की अंत्यसंस्कार करण्यासाठी जातो. त्यानंतर पुन्हा एकदा अंघोळ करून स्वच्छतेची काळजी घेऊन कामाला सुरुवात करतो' असं रजाकने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...
तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती
"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"
धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या