नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. रुग्णांची सेवा करताना कोरानाची लागण होऊ नये यासाठी डॉक्टर पीपीई किट परिधान करतात. मात्र बनारसमध्ये एक पानवाला पीपीई किट घालून पान विकत आहे.
पीपीई किटमधील पान विक्रेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बनारसमधील एका पानवाल्याने पीपीई किट परिधान केल्याची माहिती मिळत आहे. राहुल चौरसिया असं या पानवाल्याचं नाव असून त्याचं स्वस्तिक पान दुकान आहे. लॉकडाऊनदरम्यान हे दुकान बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र आता तरुणाने पीपीई किट घालून पान विकण्यास सुरुवात केली आहे. पीपीई किटमुळे राहुल अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला आहे.
"मी पीपीई किट परिधान करून दुकानात येतो. दुकानात आल्यावर सर्वप्रथम दुकान सॅनिटाईझ करतो आणि येणाऱ्या ग्राहकांनाही सॅनिटायझर देतो. त्यानंतर त्यांना पान दिलं जातं. कोरोनाच्या संकटात ग्राहक आणि माझी अशा दोघांच्याही प्रकृतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसेच दिवसातून दोन वेळा माझं संपूर्ण पीपीई किट देखील सॅनिटाइझ करतो" अशी माहिती पानविक्रेत्याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शनिवारी (11 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 27,114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आठ लाखांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,83,407रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5,15,386 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम
CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार
CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"
CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन