गुवाहाटी - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांच्या वर पोहोचली आहे. तर 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली आहे.
केरळमध्येआसाममधून स्थलांतरीत झालेले अनेक मजूर हे काम करतात. सध्या इतर ठिकाणी असलेल्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र या उलट परिस्थिती ही केरळमध्ये पाहायला मिळत आहे. आसामच्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची फारशी घाई नाही. कारण या परिस्थितीत ते आपल्या कामाच्या ठिकाणी अर्थात केरळमध्येच राहण्याला अधिक पसंती देत आहेत. मंगळवारपर्यंत आसाममध्ये वेगवेगळ्या राज्यांतून जवळपास 50 हजार स्थलांतरीत मजूर परतले आहेत. मात्र यामध्ये एकही मजूर हा केरळहून आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या पूर्वेत्तर राज्यात जवळपास 40 ते 50 हजार तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे रहिवासी असलेले दंबेस्वर बरुआ हे गेल्या 26 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ते केरळमध्ये आले. काही लोक सोडले तर अधिकतर स्थलांतरीत मजूर हे सध्या केरळमध्ये सुरक्षित आहेत. त्यांना सगळ्या सेवा-सुविधा मिळत आहेत. त्यामुळेच त्यांना आसामला परतण्याची इच्छा नाही अशी माहिती दंबेस्वर यांनी दिली आहे.
केरळच्या पोलीस महासंचालकांनी मजुरांना आपला खासगी मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यामुळे संकटकाळात ते तत्काळ पोलिसांची मदत घेऊ शकतात. आसामचे रहिवासी असलेल्या मंटू दत्ता यांनीही केरळच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे. मंटू हे एर्नाकुलम जिल्ह्यातील एका बर्फाच्या कारखान्यात फ्रिजिंग ऑपरेटर म्हणून काम करतात. 'स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी पंचायत सदस्यही धावून आले. ते सतत आमच्या संपर्कात आहेत. माझ्या मालकाकडून मला बेसिक पगार मिळत आहे. कारखाना सुरू झाल्यावर आम्हाला आमचा पूर्ण पगारही मिळणं सुरू होईल' असं मंटू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप
कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान
CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय