CoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 02:37 PM2020-05-28T14:37:08+5:302020-05-28T14:54:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
स्थलांतरित मजुरांच्या मुद्दावरुन सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा. काही कुटुंबांना दर महिन्याला 7500 रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच स्थलांतरित मजुरांचा विषय हाताळण्यामध्ये सरकार कमी पडले असून मजुरांच्या विषयाकडे मोदी सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले, त्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुरेशी पावले उचलली नाहीत असं सोनिया यांनी म्हटलं आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गाँधी का सन्देश#SpeakUpIndiapic.twitter.com/cvUDJoezrj
— Congress (@INCIndia) May 28, 2020
'गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाखो मजूर उपाशीपोटी, कुठल्याही औषधांशिवाय शेकडो किलोमीटरची पायपीट करुन घरी परतत आहेत. कोटयवधी लोक बेरोजगार झालेत, कारखाने बंद झाले आहेत. पण कदाचित सरकारला याची कल्पना नसावी. केंद्राला विनंती आहे, तुम्ही खजिन्याची पेटी उघडा व गरजुंना तात्काळ मदत करा. काही कुटुंबांना दर महिन्याला 7500 रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या आणि त्यात 10 हजार रुपये तात्काळ द्या' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : भारताच्या शेजारच्या देशांत कोरोनामुळे अशी आहे परिस्थितीhttps://t.co/j9gCtqMHdW#CoronaVirusUpdates#coronavirus#CoronavirusCrisis
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
'सरकारकडे लॉकडाऊनसंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्लॅन नव्हता. सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते. सातत्याने लॉकडाऊन केल्याचा काहीही फायदा झाला नाही, परिणाम खराबच आले. कोरोना टेस्ट आणि पीपीई किटसाठीही हे सरकार फेल ठरले. अर्थव्यवस्था कोलमडली. लॉकडाऊनच्या नावावर क्रूर थट्टा झाली. पीएमओकडे सर्वप्रकारची ताकद आहे. त्याचा वापर कर्मचारी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जावा' असं काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं.
धक्कादायक! विकण्यामागचं कारण ऐकून व्हाल हैराणhttps://t.co/7h4QOOSEHH#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! हा कसला बाप?... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का
CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला
CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...
CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर