जयपूर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत १९,४५९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ५,४८,३१८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात कोरोनाचे ३८० बळी घेतले आहेत. आतापर्यंत एकूण १६,४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात.
कोरोनाच्या संकटात देशामध्ये जनजागृतीसाठी कोरोनाची कॉलर ट्यून ठेवण्यात आली आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारतर्फे ऐकवण्यात येत असलेल्या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेतला आहे. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी कोरोना व्हायरसची जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे.
मार्च महिन्यात ही ट्यून सुरू करण्यात आली. आणि आता तर जून महिना आला आहे. ज्यांना ही ट्यून ऐकायची आहे, आणि समजायचे आहे ते आतापर्यंत समजले असतील. आता यापुढेही ही ट्यून सुरू ठेवू नये. ही ट्यून ऐकून आता कान कंटाळले आहेत असं भरत सिंह यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी भरत सिंह यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये दारूबंदी हटवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"
CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख
TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा