भोपाळ - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकूण रुग्णांची संख्या ही 22,15,075 पर्यंत पोहोचली आहे. एका दिवसात तब्बल 62,064 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,007 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात आतापर्यंत 44,386 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवराज सिंह चौहान हे भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात 25 जुलैपासून उपचार घेत होते. मात्र त्यानंतर त्यांनी आता कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. यानंतर त्यांनी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या या संकटात इतरांचा जीव वाचवता यावा म्हणून प्लाझ्मादान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोना रुग्णांसाठी देशात प्लाझ्मा थेरपी ही फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि जनतेने मिळून काम करणं गरजेचं असल्याचं शिवराज यांनी म्हटलं आहे. लवकरात लवकर कोरोनाग्रस्तांची माहिती मिळावी आणि आरोग्य विषयक सुविधा तातडीने लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्यावर 11 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर पाच ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचं युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी आता जनतेसाठी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल 21 लाखांचा टप्पा पार केला असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला
माणुसकीला काळीमा! नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...
बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा
घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य