नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र अडचणीत असलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे आकारत असल्यानं विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. यानंतर आता रेल्वेनं याबद्दल महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नाहीयेत. रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं रेल्वेतील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,' अशी माहिती देण्यात आली आहे.
CoronaVirus News: मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 11:49 AM