नवी दिल्ली - कोरोनाचा देशात कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमवला असून रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे आपलेही परके झाले आहेत. देशातील रुग्णसंख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. अनेकांनी कोरोनामुळे आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. याच दरम्यान मन सुन्न करणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे.
झारखंडच्या रांचीमध्ये मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला रुग्णालयात सोडून जन्मदात्यांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 18 दिवसांच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजताच आई-वडिलांनी त्याला रुग्णालययात सोडून पळ काढला आहे. शेवटी रुग्णालयानेच बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
18 दिवसांच्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडची राजधानी रांचीमधील रिम्स (RIMS) सुपर स्पेशालिटी विंगमध्ये दाखल केलेल्या एका 18 दिवसांच्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याचे कुटुंबीय त्याला रुग्णालयातच सोडून पळून गेले. चार दिवसांपूर्वी बाळाच्या आई-वडिलांना अनेकदा सांगूनही ते रुग्णालयात परत आले नाहीत. अशावेळी रिम्सच्या डॉक्टरांनी बाळाचा जीव वाचविण्याचे ठरवलं.
डॉक्टरांना काही स्वयंसेवी संघटनांनीही मदत केली. सोमवारी या नवजात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. सध्या बाळाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सर्जन डॉ. अभिषेक रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्याची माहिती दिली आहे. नवजात बाळाला रिम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी केली तेव्हा बाळ कोरोना पॉझिटिव्ह आलं.
बाळाला कोरोनाची लागण; रुग्णालयात सोडून आई-वडिलांनी काढला पळ
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर विश्रामपूरमध्ये राहणारे आई-वडील बाळाला रुग्णालयात सोडून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. रिम्सने याची सूचना रांची जिल्हा प्रशासनाला दिली. रांची प्रशासनाने याबाबत बाळाच्या आई-वडिलांना सांगितले, मात्र ते आले नाहीत. आजी-आजोबांना याबाबत समजताच ते रुग्णालयात पोहोचले. आता ते बाळाचा सांभाळ करत आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका
"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र
CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू
CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय